Mumbai Accidentपश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, मालाडमध्ये डंपरने बाईकला चिरडले, एकाचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) मालाडजवळ (Malad) एक भीषण अपघात झाला असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास एका भरधाव डंपरने बाईकला धडक दिल्याने हा अपघात घडला. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर झालेल्या या अपघातात बाईकवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मुंबईतील रात्रीच्या वेळेतील अवजड वाहनांच्या वेगाचा आणि रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement