Farmers Protest: 'सरकारने आंदोलनावर डाव टाकला', Manoj Jarange यांचा Bacchu Kadu यांना पाठिंबा
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नागपुरातील शेतकरी आंदोलनात मराठा नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सामील होत पाठिंबा जाहीर केला आहे. 'तर कोर्टाने निकाल दिला असला तरी सरकारनं शेतकरी आंदोलनावर डाव टाकला', असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला सरकारने चर्चेसाठी मुंबईत बोलावणे हा सरकारचा डाव असून त्याला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल, असे जरांगे म्हणाले. बच्चू कडू यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी मुंबईला जाणार असले तरी, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आता जरांगे आणि कडू एकत्र आल्याने आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement