Shaktipeeth Expressway:शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, 18 जूनला मोर्चा : शाहू छत्रपती महाराज
Shaktipeeth Expressway:शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, 18 जूनला मोर्चा : शाहू छत्रपती महाराज कोल्हापूची अंबाबाई. तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या महत्त्वाच्या तीन शक्तिपीठांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कोल्हापूरसह १२ जिल्ह्याती शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध केलाय. शक्तिपीठ महामाग्रागविरोधात १८ जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणारेय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शक्तिपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांच्या रागाचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसल्याने, त्यांचा पराभव झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे महायुतीचे नेतेही आता या महामार्गाला विरोध करताना दिसतायत. म्हणूनच, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्ग हा कळीचा आणि वादाचा मुद्दा बनणारेय.
कसा आहे शक्तिपीठ महामार्ग?
कोकणातील बांधा ते वर्ध्यापर्यंत ८०५ किलोमीटरचा महामार्ग
१२ जिल्ह्यांतील २७ हजार ५०० एकर जमीन हस्तांतरित होणार
शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल ८६ हजार कोटींचा खर्च येणार
कोल्हापूरची अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी या तीन शक्तिपीठांना जोडणार
गरज नसताना ठेकेदारांच्या फायद्यासाठी महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप