Farmers Nashik to Mumbai : 550 शेतकऱ्यांचं नाशिक ते मुंबई पायी आंदोलन, ईडी कार्यालयाला देणार भेट
नाशिक जिल्ह्यातील अंबड येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील भूखंड घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती अंबडचे सदस्य अंबड ते मुंबई पायी चालत निघाले आहेत. आज या शेतकऱ्यांचा चालत निघाल्या नंतरचा चौथा दिवस आहे. याबाबत बोलताना अंबडहुन चालत आलेले दिलीप बल्लाळ म्हणाले की, आम्ही एकूण 550 शेतकरी आहोत. आमच्या ज्यावेळी जमिनी देण्यात आल्या होत्या त्यावेळी जी आश्वासन देण्यात आली होती ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शिवाय आमच्या जमिनी खाजगी विकासकाला देऊन त्यातून प्रचंड पैसा कमवण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवण्यासाठी आम्ही अंबड ते मुंबईतील ईडी कार्यालयापर्यत चालत निघालो आहे. त्याठिकाणी जाऊन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणार असून याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. या विषयी या शेतकऱ्यांशी अधिक बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी