
Farmer Electricity Bill : कृषिपंपाची वीजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 मधून वर्षानुवर्षे थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. थकबाकीच्या योजनेनुसार महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीचे १५ हजार ९६ कोटी 66 लाख रुपये माफ करण्यात आले आहे. आता चालू वीजबिल आणि येत्या मार्च 2022 पर्यंत सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास राज्यातील 44 लाख 50 हजार शेतकऱ्यांना तब्बल 15 हजार 353 कोटी 88 लाख रुपयांची आणखी माफी मिळणार आहे. सोबतच थकीत वीजबिलदेखील कोरे होणार आहे.
Continues below advertisement