Farmers Loss : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना कधी भरपाई मिळणार?

मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत शेतीचं नुकसान झालंय. म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिलेत. पण यामध्ये काही प्रमाणात प्रशासनाची उदासीनता दिसून येतेय. कारण राज्यातील तब्बल 30 वरिष्ठ महसुली अधिकारी अद्याप त्यांच्या पदावर रुजू झालेले नाहीत. मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने तब्बल 30 उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपासून पोस्टिंग स्वीकारलेली नाही. यातील बरेचसे  अधिकारी अजूनही मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारतायत. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेकठिकाणी प्रशासन कमी पडताना पाहायला मिळतय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola