Farmer Distress: 'चिट्ठी लिहून जीव देण्याचा विचार आला', Parbhani मध्ये शेतकरी महिलेला अश्रू अनावर
Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मराठवाडा दौऱ्यात परभणीच्या (Parbhani) डेंगळी पिंपळगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना एक महिला अक्षरशः कोसळली. 'चिट्ठी लिहून ठेवा आणि आमच्या लेकरांचं फक्त तुम्ही शिक्षण करा... तेव्हा वाटलं होतं की खरंच हा मार्ग पत्करावा', असे सांगत या शेतकरी महिलेने आपल्या मनात आत्महत्येचा विचार आल्याची कबुली दिली. दिवाळीत मुलांसाठी साधे कपडेही घेता आले नाहीत आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज उपाशी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पीक नुकसानीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आमच्या मुलांच्या शिक्षणाची तरी सोय करा आणि आम्हाला आमच्या हक्काचे द्या, अशी आर्त विनवणी या महिलेने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement