Faridabad Terror Module: डॉक्टर मुझम्मिल आणि आदिलच्या 'टेरर फॅक्टरी'चा पर्दाफाश, 2900 किलो स्फोटकं जप्त
Continues below advertisement
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशात मोठी कारवाई करत एका 'व्हाइट-कॉलर टेरर मॉड्युल'चा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आली असून, यात डॉ. मुझम्मिल अहमद गनाई आणि डॉ. आदिल अहमद राठेर यांचा समावेश आहे. फरीदाबादमधील दोन ठिकाणांहून सुमारे २९०० किलो अमोनियम नायट्रेट, एके-47 रायफल आणि बॉम्ब बनवण्याचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'तपासात एक व्हाईट-कॉलर दहशतवादी इकोसिस्टम उघडकीस आली आहे, ज्यामध्ये कट्टरपंथी व्यावसायिक आणि विद्यार्थी परदेशात बसलेल्या पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते'. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद या संघटनांशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement