Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनच्या (Nowgam Police Station Blast) परिसरात मोठा स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 29 हुन अधिक लोक जखमी झाल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी श्रीनगरमधील (Srinagar) नौगाम पोलीस स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झालाय, ज्यामुळे परिसरातील इमारतीचे मोठे नुकसान झाले असून इमारतीच्या काही भागांना आग लागली.
प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री हा परिसर मोठ्या स्फोटाने हादरला, ज्यामुळे धुराचे लोट आणि ज्वाळा हवेत पसरल्या होत्या. स्फोटात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली. सध्या या संदर्भात अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. मात्र दिल्लीतील कार स्फोटानंतर श्रीनगर पुन्हा एकदा हादरले आहे.