Parmeshwar Meshram : धानोरकरांवर आरोप, परमेश्वर मेश्रामांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार, प्रकरण काय?

Continues below advertisement
परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवागारात आहे. मेश्राम यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे. परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूला काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे सासरे अनिल धानोरकर जबाबदार आहेत असा कुटुंबियांनी आरोप केला आहे. त्यामुळे आमच्या शेतजमिनीचा सात बारा आमच्या नावावर करावा, धानोरकर कुटुंबियांकडून ताबा मिळवून द्यावा आणि पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे. परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूला आज तीन दिवस पूर्ण झालेले आहेत आणि अद्यापही त्यांचा मृतदेह कुटुंबीय स्वीकारण्यास तयार नाहीये. त्यामुळे त्यांचा मृतदेह चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आलेला आहे. अद्यापही या पूर्ण प्रकरणावर काही तोडगा निघालेला नाहीये. कुटुंबियांनी आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही. आज ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत आणि या चर्चेनंतर काही मार्ग निघण्याची शक्यता आहे. मात्र, कुटुंबिय आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यांना पोलीस सुरक्षा मिळावी अशीही मागणी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola