Fake Voter ID : 'Donald Trump' चं बोगस आधारकार्ड, Rohit Pawar यांचा थेट आरोप

Continues below advertisement
Rohit Pawar यांनी पत्रकार परिषदेत 'Donald Trump' या नावाने बोगस आधारकार्ड तयार करून मतदार यादीत फेक मतदार कसे तयार होतात, याचं प्रात्यक्षिक दाखवलं. 'बोगस आधारकार्ड वापरून बोगस मतदार कसे तयार केले जातात, हे मी आज दाखवलं,' असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. या प्रात्यक्षिकात कोणताही क्रमांक टाकून आधारकार्ड तयार करता येतं, हे त्यांनी दाखवलं. यामुळे मतदार यादीतील फसवणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रोहित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी या प्रकारावरून निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola