Rajapur : बाहेरच्या विद्यार्थ्यांना राजापूरचं रहिवाशी पत्र, रत्नागिरीच्या राजापूरमध्ये धक्कादायक प्रकार
राजापूर तालुक्यातील पडवे नवोदय महाविद्यालयाच्या प्रवेशाकरता परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राजापूरच्या तहसीलदारांनी दिलेल्या रहिवाशी दाखल्यावरून पालक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या विध्यार्थ्यांना कशाच्या आधारे दाखला दिला? असा सवाल त्यांनी केला आहे. याप्रकरणात आता चौकशी व्हावी अशी मागणी या पालकांची आहे.