Casting Scam : 'निर्माता' असल्याचं सांगत Rohit Arya चा अनेक कलाकारांना गंडा, अभिनेत्री Ruchita Jadhav लाही केली होती ऑफर
Continues below advertisement
चित्रपटसृष्टीत काम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रोहित आर्या (Rohit Arya) प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav), ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) आणि उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kanetkar Kothare) यांचीही नावे समोर आली आहेत. 'मी एक चित्रपट करणार आहे आणि मला त्याच्याबाबतीत तुमच्याशी चर्चा करायची आहे', असा मेसेज रोहित आर्याने अभिनेत्री रुचिता जाधवला पाठवला होता. रोहित आर्याने 'लेट्स चेंज फोर' (Lets Change Four) नावाच्या वेबसिरीजच्या शुटींगच्या तयारीत असल्याचे सांगून अनेक कलाकारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. याचनिमित्ताने गिरीश ओक आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांनी त्याच्या 'आरए स्टुडिओ'ला (RA Studio) भेट देऊन ऑडिशन देत असलेल्या मुलांशी संवाद साधला होता. अभिनेत्री रुचिता जाधवला देखील त्याने चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून स्टुडिओमध्ये भेटायला बोलावले होते, मात्र वैयक्तिक कारणांमुळे ती जाऊ शकली नाही. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement