Fake Duplicate Liquor : बनावट दारुपासून सावध रहा, पोलिसांच्या सूचना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Dec 2022 10:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जय्यत तयारी केलीय. दोन वर्षांनतर नववर्षाच्या जल्लोषाला निर्बंधांचं बंधन नसल्यामुळे ३१ डिसेंबरला सेलिब्रेशन करण्यासाठी लोकांना उत्साह ओसंडून वाहतोय. मात्र त्याचवेळी बनावट दारूचाही महापूर येण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केलीय. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट दारूपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बनावट दारूसोबतच गोवा बनावटीची दारूचीही मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते. म्हणून, पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर ठेवलीय.