Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी बनावट औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाचं आवाहन ABP Majha
Continues below advertisement
तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. औषधं खरेदी करताना ती बनावट तर नाहीत ना याची खात्री करून घ्या. कारण राज्यभरात अनेक ठिकाणी बनावट औषधांच्या विक्रीचा सुळसुळाट झालाय. आणि औषधं खरेदी करताना सावधानता बाळगा असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केलंय. राज्यातून तसेच परराज्यातूनही बनावट औषधं विक्रीसाठी येत असल्याची माहिती समोर आलीय. अन्न व औषध प्रशासन विभागानं नुकतीच जळगाव जिल्ह्यात याबाबत कारवाईदेखिल केली होती. छापे टाकून बनावट इंजेक्शनच्या व्हायल्सही जप्त केल्या होत्या.
Continues below advertisement