Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल,फडणवीसांचा ठाकरेंना सणसणीत टोला
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं, त्यावेळेसही ते कारपेटवरून खाली उतरले नव्हते,' असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सततच्या पराभवानंतर ठाकरेंना आता लोकांमध्ये जावे लागत असल्याचे जाणवले आहे, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते शेतकऱ्यांकडे जात असल्याने शेतकरी त्यांच्याकडे पाठ फिरवत आहेत, असेही फडणवीस म्हणाले. दुसरीकडे, 'माझ्यावर शेतीतले काय कळते म्हणून टीका झाली, पण मी शेतकऱ्यांमध्ये जाऊन उभा राहू शकतो, तुम्हाला कळत असेल तर तुम्ही जाऊन दाखवा,' असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिले आहे. सरकारचे पॅकेज लोकांच्या खात्यात पोहोचत असल्यामुळे ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळत नाही आणि गर्दी जमवण्यासाठी लोकांना पकडून आणावे लागत आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement