Political War: 'विकासावर एक भाषण दाखवा, हजारो मिळवा', Fadnavis यांचा Thackeray यांना टोला
Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मराठवाडा दौऱ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार टीका केली आहे. 'मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजारो रुपये मिळवा,' असे आव्हान देत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे केवळ टोमणे मारू शकतात आणि विकासावर बोलत नाहीत, असेही ते म्हणाले. पहिल्यांदाच उद्धवजी मातोश्रीतून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, हे पाहून बरं वाटलं, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. ठाकरे यांचे दौरे सहसा होत नाहीत, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याचे सर्वांनाच कुतूहल वाटत असल्याचे दरेकर म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement