Gelatin Sticks | अमरावतीच्या तिवसामध्ये 25 किलो जिलेटिनसह स्फोटकं जप्त, एक अटकेत
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल 25 किलो जिलेटिन कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत. या जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता याचे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही. तिवसा पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे.
Continues below advertisement