
EXPLAINER VIDEO | Corona Pandemic : मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांचं ऐकलं असतं तर!
Continues below advertisement
बिल गेट्स म्हणजे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती, विविध संशोधनासाठी हजारो कोटी रुपयांची मदत करणारा दानशूर माणूस. त्यांचं पाच वर्षांपूर्वीचं एक भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहे. कोरोना विषाणू सारखी महामारी येऊ शकते त्यातून जगभरात लाखो बळी जाऊ शकतात आणि अब्जावधींचं नुकसान होऊ शकतं याचा अंदाज बिल गेट्स यांना २०१५ सालीच आला होता. अशा महामारीला तोंड देण्यासाठी आपण तयार नाहीत याची जाणीवही त्यांनी बोलून दाखवली होती. त्या भाषणातले बारकावे सांगणारा एबीपी माझाचा हा एक्स्प्लेनर व्हिडीओ.
Continues below advertisement