EXCLUSIVE | 12 ते 15 माजी आमदार संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत येतील : एकनाथ खडसे

Continues below advertisement

 चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादांचं नाव महाराष्ट्राला कळलं. एकदाही आमच्या आंदोलनात किंवा जेलमध्ये मी दादांना पाहिलं नाही. त्यांना फार सिरियसली घेऊ नका, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे म्हणाले की, मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त चंद्रकांत दादांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अॅन्ड थ्रोची पद्धत आहे, असं खडसे म्हणाले.

'12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात'
कोणत्याही पक्षात स्पष्ट दिशा ठरलेली असते. संघटनात्मक विस्तार हे माझं यापुढचं ध्येय असेल, असं खडसे म्हणाले. राष्ट्रवादीसाठी खान्देशात काम करणं माझ्यासाठी मोठं आव्हान नाही. आमच्या भागात नाथभााऊ म्हणून 70 ते 80 टक्के मतं मिळत होती, भाजप किंवा राष्ट्रवादीचा म्हणून नाही.  12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत, ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असं खडसे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram