एकाच घरात भाजप, राष्ट्रवादी कशी नांदते? फडणवीसांच्या दौऱ्यानंतर भाजप खासदार रक्षा खडसे ‘माझा’वर
जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अशातच आज देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील कोथळी गावात जाऊन रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. त्यावेळी ते जळगावातील रुग्णालयाच्या पाहाणीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन हेदेखील होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan)
यांनी ज्यावेळी रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनात आली की, काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे यांच्या घरातील कमळ आकाराच्या घड्याळ्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोटो आहे. त्यामुळे रक्षा खडसेंच्या घरातील या घड्याळावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील रक्षा खडेसेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीसांची रक्षा खडसेंसोबत बातचित झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, रक्षा खडसे आणि गिरीश महाजन मुक्ताईनगरमधील जिल्हा उपरुग्णालयात पोहोचलेले आहेत. या दौऱ्यादरम्यान, रक्षा खडसेंच्या घरात असलेल्या कमळाच्या आकाराच्या घडाळ्याचीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं आहे. परंतु, खासदार रक्षा खडसे या अजुनही भाजपमध्येच आहेत.