Online Copy Scam : इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ विभागाच्या ऑफलाईन परीक्षांसाठी नियोजन ABP Majha

एबीपी माझानं ऑनलाइन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा पंचनामा केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबई विद्यापीठ आता टप्प्याटप्प्यानं ऑनलाई परीक्षांचा पर्याय थांबवणार आहे. मुंबई विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रम अर्थात इंजीनियरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए यांच्या  परीक्षा पुढील सेमिस्टर पासून पूर्णपणे ऑफलाइन करण्यासाठी विद्यापीठाचं नियोजन सुरू आहे. ऑनलाइन परीक्षा मध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून याची कल्पना शिक्षकांना असली तरी घरी विद्यार्थी सहजपणे कॉपी करू शकतात आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करता त्याला आळा घालण्यासाठी आता मुंबई विद्यापीठानं पावलं उचलायला सुरुवात केलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola