EVM Row: 'स्वाभिमान असेल तर UBT च्या खासदारांनी-आमदारांनी राजीनामे द्यावेत', Bawankule यांचा टोला

Continues below advertisement
ठाकरे गटाच्या शिवसेनेचा (Shiv Sena UBT) आज वरळीच्या NSCI डोममध्ये (NSCI Dome) 'निर्धार मेळावा' पार पडणार असून, यामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मतदार यादीतील घोटाळ्यांवर (Voter List Scam) सादरीकरण करणार आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी, 'जर इव्हीएमवर विश्वासच नाही तर...युबीटीच्या, राहुल गांधींच्या खासदारांनी राजीनामा द्यावा,' असे म्हणत निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत झालेली मतचोरी, दुबार मतदार आणि मतदार यादीतील अनियमितता यावर पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील उपस्थित राहणार असून ते आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. केवळ बनावट नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे मेळावे घेतले जात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola