Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 23 जुलै 2024 : ABP Majha

Continues below advertisement

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार, यंदाचा अर्थसंकल्प ४७ लाख ६५ हजार ७६८ कोटींचा असणार.  

आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वाचं लक्ष, शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलत मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याकडे लक्ष 

भाजप कोअर कमिटीची सागर बंगल्यावर बैठक संपन्न, बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. 

संघ आणि भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक,  प्रदेश भाजपच्या संघटन मंत्र्यांसह संघाचे काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मोठं महत्त्व.   

राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरण, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होणार याकडे लक्ष. 

दिल्लीत आज काँग्रेसची बैठक, विधानसभेचं जागावाटप आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाईसंदर्भात बैठक आयोजित. नाना पटोले, वडेट्टीवार बैठकीला जाणार. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार, तसेच निवडणुकीसाठी राज्यातील दौरा जाहीर करणार 

आज अहमदनगरमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा, पाथर्डीमध्ये सभेचं आयोजन.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram