सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराई आणि अग्रणी फाऊंडेशनतर्फे 19 हेक्टरवर जैवविविधता उद्यानाची उभारणी
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे वनविभाग, सह्याद्री देवराई आणि अग्रणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जैवविविधता उद्यान उभारण्यात आले. या उद्यानाच्या सयाजी शिंदे यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अभिनेते सागर कारंडे, उपवनसंरक्षक विजय माने, चितळे उद्योग समुहाचे गिरीश चितळे उपस्थित होते. माणसाच्या जीवनात ऑक्सिजनचे असलेले महत्व आता सर्वांना पटले आहे. झाडांमुळेच मुबलक ऑक्सिजन मिळतो हे लक्षात घेऊनच अग्रण धुळगावच्या निसर्गप्रेमींनी हाती घेतलेली मोहीम स्तुत्य अशी आहे.
Tags :
Sangli Sayaji Shinde Save Trees Sagar Karande Sahyadri Foundation Agrani Foundation Bio Dioversity Kavthe Mahakal