Ishwarlal Jain : EDच्या कारवाईवर ईश्वरलाल जैन यांची एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत
Continues below advertisement
शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि साथीदारांच्या जवळपास नऊ ठिकाणांची ईडीनं गेल्या दोन दिवसांत झडती घेतली आहे. ईडीच्या मुंबई स्थित झोन-2 युनिटने या प्रकरणाचा तपास केला आणि मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद आणि जळगाव येथे शोध घेतला. ईडीने कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे गोळा केल्याचा दावा केला आहे. तसंच, जळगावमधील कार्यालयातून ईडीनं शुक्रवारी ८७ लाखांची रोकड आणि कोट्यवधींचं सोनं जप्त केलं. हा ऐवज जळगावमधील स्टेट बँकेत
ठेवण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये स्टेट बँकेनं आरएल ज्वेलर्सविरोधात सीबीआयकडे एफआयआर दाखल केली होती. त्याबाबत ईडी तपास करत आहे.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Jalgaon Cash Investigation Gold Seized Thane Aurangabad Mumbai Nagpur ED Nearest Ishwarlal Jain Accomplice Searching Zone-2 Unit