Amaravati Epidemic disease : अमरावती जिल्ह्यात साथीच्या रोगाचं थैमान,बेडपेक्षा रुग्णांची संख्या अधिक

Continues below advertisement

Amravati : अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यु, मलेरिया आणि हिवतापाने कहर केला आहे.. तर अमरावती जिल्हा रुग्णालयातील बाल रोग वार्डात बेडच रिक्त नसल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आलेली आहे. बाल वार्ड मध्ये सध्या 59 बालके उपचार घेत आहेत, तर ग्रामीण भागातही बिकट अवस्था आहे, त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचे चित्र आहे, अमरावती महानगरपालिका हद्दीत 43 तर मलेरियाचे तीन रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागातील मोर्शी आणि अचलपूर डेंग्यूच मोठं हॉटस्पॉट आहेत, अचलपूरात तब्बल 383 तर मोर्शीत 159 डेंग्यूचे रुग्ण आहेत, तर जिल्ह्यात महिना भरात 9 रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटीत बेड रिक्त नव्हते. मात्र, आता कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असली तरी डेंग्यु आणि इतर साथ रोगाने डोकं वर काढल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयात गर्दी वाढली आहे, विविध आजार असल्याने  रुग्णालयात गर्दी वाढली आहे, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही, तसेच अजून बेड वाढवण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram