Elon Musk Twitter : ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे, 3 बड्या अधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं ABP Majha
Continues below advertisement
ट्विटरची मालकी आता टेस्लाच्या एलन मस्क यांच्याकडे गेली आहे. 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवहारावर मस्क यांनी अखेर शिक्कामोर्तब केलाय. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी ट्विटरच्या तीन टॉप अधिकाऱ्यांना कंपनीतून हटवलं. मस्क यांनी ट्विटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह पराग अग्रवाल, चीफ फायनान्स ऑफिसर नेद सेगल आणि लीगल आणि पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांना तातडीनं हटवण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवरील फेक अकाऊंटबाबत मस्क आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना हटवण्यात आलंय.
Continues below advertisement