Vantara On Elephant Mahadevi | न्यायालयाने आदेश दिल्यास वनतारा हत्तीणीला परत करु

कोल्हापूरच्या नांदणी मठातून नेलेली हत्तीण महादेवी Vantara येथे सुरक्षित आहे. Vantara ने दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रकृती सुधारत आहे. महादेवीला कोल्हापूरमध्ये परत पाठवण्याच्या मागणीसाठी रविवारी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. याचवेळी Vantara ने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. या प्रसिद्धीपत्रकात Vantara ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "वन्यजीव विभाग तसंच जैन मठाने याचिका दाखल करून न्यायालयाकडनं संमती मिळवली तर हत्तीणीला परत पाठवलं जाईल," अशी भूमिका संग्रहालय प्रशासनाने घेतली आहे. महादेवीच्या हस्तांतरणावरून Kolhapur मध्ये जनभावना तीव्र झाल्या आहेत. तिच्या आरोग्याबाबत आणि परत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola