Elephant Madhuri | महादेवी हत्तीणीच्या उपचारांचा 'रियालिटी चेक', ABP Majha ची टीम वनतारामध्ये

महादेवी हत्तीणीमुळे वनतारा अभयारण्य सध्या चर्चेत आहे. एबीपीचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी वनतारा येथे जाऊन हत्तीणीच्या उपचारांचा 'रियालिटी चेक' केला. नांदणी मठातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महादेवीला वनतारा येथे आणण्यात आले होते. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टर अक्षय यांनी सांगितले की, "तिच्या जे प्रामुख्याने नखाचे, पायाच्या, पोटाचे जे फ्रॅक्चर्स आहे, त्यासाठी आम्ही उपचार चालू केलेले आहेत." तिच्यावर हायड्रो थेरपी, हर्बल वॉर्म वॉटर मसाज आणि ऑइल मसाज असे विविध उपचार केले जात आहेत. तिच्या तब्येतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. कोल्हापूरकरांची महादेवीबद्दल मोठी भावनिक ओढ आहे आणि तिला परत आणण्याची मागणी होती. हत्ती अतिशय संवेदनशील प्राणी असल्याने तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली जात आहे. मानसिकदृष्ट्या तिला डिप्रेशनमध्ये जाऊ नये यासाठी सोशलायझेशनवर भर दिला जात आहे. वनतारा प्रशासन महादेवीला पुन्हा कोल्हापूरला पाठवण्यापूर्वी ती पूर्णपणे सदृढ असावी यासाठी काम करत आहे. वनतारा येथे एकूण २५९ हत्ती आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola