Haridwar Elephant Special Report : जंगलसोडून हत्तीचं कळप हरिद्वारच्या गल्लीत, पाहा व्हिडीओ
हरिद्वारमध्ये सध्या रस्त्यांवर माणसं किंवा वाहनं दिसत नाहीत, तर हत्तींचा कळप फिरताना दिसतोय. हरिद्वारच्या भागीरथी विहार कॉलनीमध्ये हे दृश्य पाहायला मिळत आहे. या हत्तींच्या कळपासमोर वनविभागानेही हात टेकले आहेत. लोक घरात आहेत आणि हत्ती बिनधास्त रस्त्यावर फिरत असल्याचं चित्र आहे. मानवी वस्तीत हत्तींची दहशत वाढल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. लोकवस्तीपासून हत्तींना लांब ठेवण्याचे वनविभागानं खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. लोकांना घराबाहेर पडणंही कठीण होऊन बसलंय. हत्तींना घाबरून वाहन चालकही जागेवरच थांबत आहेत, तर लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलंय. आता हे हत्ती लोकवस्तीत शिरलेत की त्यांच्या अधिवासात मानवानं कब्जा केलाय, याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.