बंद मंदिरांना वीज बिलाचा शॉक! विठ्ठल मंदिराला लॉकडाऊनमध्ये एक कोटीचं दान अन् वीजबिल 84 लाख
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे जवळपास 15 महिने बंद आहेत. त्यामुळे भाविकांचं नसल्याने तिजोरीचाही खडखडाट झाला आहे. मात्र मंदिरे बंद असली तरी देवाचे नित्योपचार नियमानुसार सुरु असून मंदिराची भक्त निवास,दर्शन मंडप आणि इतर उपक्रमाचा खर्चही सुरूच आहे . यामुळे आता मिळणारे तोकडे उत्पन्न देखील सगळे वीज बिल भरण्यात जाऊ लागल्याने कर्मचारी पगार आणि इतर खर्चाचा प्रश्न देखील आ वासून समोर उभा राहिला आहे. वास्तविक राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे संकट संपले नसल्याने मंदिर न उघडण्याची राज्य शासनाची भूमिका रास्त आहे पण आता मंदिरांच्या खर्चाचा बाबतीत देखील मदतीच्या दृष्टीने विचार करणेचे गरजेचे बनले आहे.
Continues below advertisement