OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांवरील निवडणुका रद्द ABP Majha
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचं काय होणार हा यक्षप्रश्न राज्य सरकार समोर उभा होता.. मात्र त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसींच्या जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील एकूण १ हजार ८०२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र ओबीसी आरक्षणावरील कायदेशीर पेचानंतर 400 जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्यात. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक जरी स्थगित केली असली तरी इतर प्रवर्गातील जागांवर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होणार आहेत.
Continues below advertisement