Ravindra Shobhane : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड
abp majha web team
Updated at:
25 Jun 2023 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाने गुरुजी यांची कर्मभूमी अमळनेऱ येथे भरणाऱ्या यंदाच्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आलीये. आज पुणे येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. २ ते ४ फेब्रुवारी असे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. अखेर, रवींद्र शोभणे यांच्याबाबत बहुमत झाले आणि त्यांची निवड जाहीर करण्यात आली.