Bogus Voters:'आम्ही फक्त यादी Adopt करतो', सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरून निवडणूक आयुक्त तोंडावर आपटले
Continues below advertisement
मतदार यादीतील (Voter List) गोंधळावरून आणि मनसेने (MNS) सुलभ शौचालयाचा पत्ता (Public Toilet Address) मतदार म्हणून नोंद असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयुक्त (Election Commissioner) पत्रकारांच्या प्रश्नावर अडखळले. 'ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो,' असे उत्तर देऊन त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी विचारले की या यंत्रणेवर तुमचा वचक नाही का, तेव्हाही त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. राज्य निवडणूक आयोगाची आणि भारत निवडणूक आयोगाची जबाबदारी निश्चित केलेली आहे, असे ते म्हणाले. मात्र, मतदार यादीतील या गंभीर त्रुटीवर ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement