Election Commission 2022 : कोरोनाकाळात निवडणुका घेणं आव्हानात्मक- निवडणूक आयोग ABP Majha
Continues below advertisement
कोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गोवा राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी, उत्तराखंडचा कार्यकाळ 23 मार्च रोजी, पंजाब राज्याचा कार्यकाळ 27 मार्च रोजी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ 14 मे रोजी संपणार आहे.
Continues below advertisement