Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : धनुष्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाच्या लढाईला वेग

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातली पुढची लढाई आता जवळ येऊन ठेपलीय. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार? हे येत्य़ा काही दिवसात स्पष्ट होईल,....या लढाईला आता वेग आलाय... उद्या म्हणजे ७ तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय कधी लागणार याची उत्सुकता आहे. दोन्ही गटाला उद्या निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करावी लागणार आहेत...  ६ ते ७ लाख प्रतिज्ञापत्र सादर करायची असल्यानं शिवसेना आणखी वेळ मिळावा अशी विनंती करण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola