ABP News

Eknath Shinde vs Sunil Raut : ठाकरेंची लंडणवारी, मुख्यमंत्र्याटा टोला, सुनील राऊतांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

लंडन दौैऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केलीय...मी लंडनला जाऊ शकत नाही, मुख्यमंत्री असल्यानं मला राज्यात काम करावंच लागतं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या सुनील राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. चोरलेले आमदार सांभाळण्यासाठी शिंदेंना वर्षावर बसावं लागतं असा टोला सुनील राऊत यांनी लगावला.. 

मुंबईत महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना सुुरुवात झाली.. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला तर आज आशिष शेलार यांनी ग्राऊंडवर जाऊन नालेसफाईची पाहणी केली..यावेळी आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावर टीका केली..उद्धव ठाकरे आता लंडनचे नाले पाहतात का असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केलाय.. तर आशिष शेलारांच्या टीकेला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी जोरदार पलटवार केलाय.. मुख्यमंत्री आणि आशिष शेलारांमध्ये वाद दिसतोय. तसंच महायुतीत श्रेयवादाची लढाई दिसत असल्याचंही अनिल परब यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram