Eknath Shinde Voting Video : संपूर्ण कुटुंबाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान केंद्रावर

Continues below advertisement

Thane Loksabha Election 2024: राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचण आल्या होत्या, त्या दूर झाल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकली आहेत. त्यांना अशी वक्तव्य सुचतायेत, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांवर केली. 

⁠फतवे काढणे ही आश्चर्यकारक आहे, असं घडणं चुकीचं आहे. विकास आम्ही करतोय. कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करतायेत. जे 50-60 वर्षे काँग्रेसला करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी केले. युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे. त्यांचेयासाठीच आम्ही काम करतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. युवकांनी बाहेर येवून मतदान करावे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram