Eknath Shinde Vidhansabha Planning : शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन हंड्रेड प्लस, मित्रपक्षांच्या मतदारसंघावर दावा नाही
Eknath Shinde Vidhansabha Planning maharashtra Vidhansabha ABp majha
ज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत असे असताना देवेंद्र फडणवीस यांचेवर मनोज जरांगे पाटील यांची टीका का असा सवाल करीत त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करीत आहे . ते आता मराठा समाजाचे नेते म्हणून काम करीत असताना त्यांना आता याचे ज्ञान मिळाले पाहिजे अशी टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली .
मनोज जरंगे पाटील यांच्याकडून काही दिवसापासून सातत्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीस याना लक्ष करण्यात येत असताना राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाचे कोणताही मंत्री याविरोधात बोलताना दिसत नाही . यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे . याला तोंड फोडायचे काम नरेंद्र पाटील यांनी केले आहे . यापूर्वी जरंगे पाटील त्यांच्या फडणवीस यांच्या टीकेवर भाजपकडून निलेश राणे , आशिष शेलार , प्रवीण दरेकर , प्रसाद लाड या नेत्यांनी आवाज उठवत जरंगे याना उत्तर दिले होते . मात्र यापैकी एकानेही राज्याचा व महायुतीचा प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर टीका का असा सवाल केला नव्हता . नरेंद्र पाटील यांनी मात्र याबाबत थेट सवाल केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेच्या जरांगे यांच्याबाबत असणाऱ्या मावळ भूमिकेवर बोट ठेवत जरांगे पाटील याना सवाल केला आहे . हा प्रश्न जरांगे याना असला तरी याच्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह केले आहे