Shinde vs Thackeray :आमदार अपात्रेताच्या सुनावणीत सुनील प्रभूंंची उलट तपासण, जेठमलानींचे प्रश्न काय?
आमदार अपात्रताप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत सुनील प्रभूंची सलग तिसऱ्या दिवशी उलट तपासणी सुरू आहे. व्हिपबाबत या सुनावणीसाठी तसंच सुप्रीम कोर्टातही खोटी कागदपत्रं सादर केली असा आरोप शिंदे गटाच्या वकिलांनी केला. मात्र संविधानाची शपथ घेत प्रभूंनी हा आरोप फेटाळला. व्हिपचा मेसेजे मनोज चौगुलेंच्या मोबाईलवरून सर्व आमदारांना पाठवल्याची साक्ष सुनील प्रभूंनी दिली. मनोज चौगुलेंच्या मोबाईलवरून हा मेसेज पाठवला असेल तर मग मोबाईल इथं का सादर केला नाही, चौगुलेंना साक्षीदार का केलं नाही असा सवाल जेठमलानींनी केलाय. या आधारावर आमदारांना व्हिपबाबत मेसेज गेलाच नव्हता असा दावा जेठमलानींनी केला.
Tags :
Uddhav Thackeray Shinde Vs Thackeray Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra Mahesh Jethmalani Sunil Pabhu