Eknath Shinde on School Uniforms :रोहित क्वालिटी बघ म्हणत, शिंदेंनी सभागृहात शाळेचा युनिफॉर्म दाखवला
मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकच व्यक्ती भारी आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी, रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukrain War) सुरू असताना भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोदींनी दोन तास युद्ध थांबवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Narendra Modi) म्हणाले. शिवरायांची वाघनखं आम्ही याच महिन्यात भारतात आणू आणि त्याचा योग्य वापरही करू अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली. राज्याच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, रशियाने ज्यावेळी युक्रेनवर हल्ला केला होता त्यावेळी त्या ठिकाणी अनेक भारतीय विद्यार्थी अडकले होते. त्यावेळी इथल्या पालकांनी नरेंद्र मोदींना कळकळीची विनंती केली. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दोन तास युद्ध थांबवलं होतं.
वाघनखांचा योग्य वापर करू
राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भारतात आणण्यात येणाऱ्या शिवरायांच्या वाघनखांवरून सरकारला टोला लगावला होता. शिवरायांची वाघनखं भारतात आणणार असं गेल्या दोन अधिवेशनापासून आम्ही ऐकतोय असं जयंत पाटील म्हणाले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवरायांची वाघनखं ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी, याच महिन्यात भारतात आणण्यात येतील आणि त्याचा आम्ही योग्य वापर करू. लोकांमध्ये उर्जा येण्यासाठी ते सर्वसामान्यांना दाखवण्यात येतील.