Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले!

Continues below advertisement

Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले! 

 विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली.   एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचेही अभिनंदन करतो. मी म्हणालो होतो.. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आलो नाही तर शेती करायला जाईन. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले...अजितदादा आले त्यामुळे बोनस आहे ..त्यानुसार 237 आमदार आहेत. त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व सुरु झालं आहे. विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं. विरोधी पक्षांच्या अध्यक्ष पदासंदर्भात अधिकार अध्यक्षांचा अभ्यास करुन निर्णय घेतील, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.   एकनाथ शिंदेंची रामदार आठवले स्टाईल शायरी- एकनाथ शिंदे यांनी सभागृहामधील भाषणात एक शायरी देखील बोलले. कर नाही, त्याला नाही डर...उसका नाम राहुल नार्वेकर...असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांना हसू आले. या शायरीनंतर रामदार आठवले आणि माझी आता युती झाली असं मिश्किल विधानही एकनाथ शिंदेंनी केलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram