Eknath Shinde Speech Kalyan : अग्निपथ अग्निपथ अग्निपथ... मोदींसमोर एकनाथ शिंदेंचा फिल्मी अंदाज
Continues below advertisement
Eknath Shinde Speech Kalyan : ठाणे : नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) आतापर्यंतचा राजकीय प्रवास म्हणजे हरिवशंराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेप्रमाणे असून ते जे बोलतात ते करतात अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांनी उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मा असा आहे की आपण आता कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीनही जागा जिंकतोय असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाराणसीमध्ये लोकप्रियता पाहिली मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वाराणसीमधील जनता ही मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी किती आतुर झाली आहे हे पाहिलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटला. वाराणसीमध्ये त्यांची लोकप्रियता पाहिली आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळाल्याचाही अभिमान वाटलं.
Continues below advertisement