Eknath Shinde on Opposition: 'बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलंय'; विरोधकांवर हल्लाबोल
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दरेगाव येथील शेतामधून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'कुठेही मी गेलो तरी (विरोधकांच्या) पोटात दुखतं, पण या सर्व पोटदुखीवाल्यांसाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत सुरू करून व्यवस्था केली आहे,' असा टोला शिंदेंनी लगावला. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, या आश्वासनाची आठवण त्यांनी करून दिली. विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे ते लोकांची दिशाभूल करत आहेत, असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला रडायला नाही, तर लढायला शिकवले आहे आणि आम्ही त्यांचेच विचार घेऊन पुढे जात आहोत, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement