Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

Continues below advertisement

Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी 

Eknath Shinde : कोणत्याही खुर्चीपेक्षा आपला स्वाभीमान महत्वाचा आहे. ही शिकवण आपल्याला बाळासाहेंबानी दिली असल्याचे  वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल पण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे विसरु नका असे एकनाथ शिंदे म्हणाले.  बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ना घर का ना घाट का? अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते

स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घऱात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडे सांभालते है असं चालत नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक असा टोला देखील उद्धव ठाकरेंना लगावला. तुम्ही विधानसभेला 97 जागा लढवल्या 20 जिंकल्या. आम्ही 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आता सांगा खरी शिवसेना कोणाची? जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केला आहे. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन अभी पूरा आसमान बाकी आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram