Ekanth Shinde Sharad Pawar : मराठा आरक्षणावर शिंदे-पवारांमध्ये 15 मिनिटं चर्चा

Continues below advertisement

Ekanth Shinde Sharad Pawar : मराठा आरक्षणावर शिंदे-पवारांमध्ये 15 मिनिटं चर्चा महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. या भेटीमागचं नेमकं कारण काय हे या लेखातून जाणून घेता येईल. राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण प्रश्न तोडगा काढावा तसेच राज्यात सध्या मराठा (maratha) आणि ओबीसी समाजामध्ये सुरू असलेला संघर्ष कायमस्वरूपी मिटावा यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन 9 जुलै रोजी करण्यात आलं होतं. सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संध्याकाळी पाच वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला अचानक विरोधी पक्षाने येण्यास नकार दिला. महाविकास आघाडीतून या बैठकीस कोणताही नेता उपस्थित नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार अशी चर्चा होती. पण, शरद पवार हे सातारा दौऱ्याहून येत असल्यामुळे तेही पोहोचू शकणार नाही अशी माहिती ऐनवेळी देण्यात आली होती. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यांची अनुपस्थिती हीच या बैठकीतील सर्वात मोठी चर्चा ठरली.    विरोधी पक्षांनी अचानक बैठकीला दांडी मारल्यामुळे दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाने विरोधकांना कोंडीत पकडलं. राज्यात मराठा ओबीसी वाद निर्माण व्हावा, तो प्रश्न असाच महाराष्ट्रात राहावा आणि आपली राजकीय पोळी त्यावर भाजली जावी यासाठी विरोधी पक्षांनी बैठकीला दांडी मारली अशा पद्धतीचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केला. त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि सभागृह तहकूब करावं लागलं. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आयोजित बैठक विधिमंडळात का घेतली नाही, सभागृहात विषय चर्चेला न आणता जाणीवपूर्वक सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक घेण्यात आल्यामुळे आम्ही बैठकीला आलो नाही, अशी भूमिका मांडली. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की, अचानक बैठकीच्या दिवशी संध्याकाळी बारामतीवरुन फोन आला आणि विरोधकांनी बैठकीला दांडी मारली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram