Eknath Shinde Delhi Visit | दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे मोदींना भेटणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेल्या आठवड्याभरातील हा दुसरा दिल्ली दौरा आहे. आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दुपारी एक वाजता भेटणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे हे INDIA आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मोदींची भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर विविध विषयांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचे कळते. कमी कालावधीत दोनदा दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय, मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत नेमकी काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यामुळे राजकारणात काही नवीन समीकरणे दिसतील का, अशीही चर्चा सुरू आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी या घडामोडींची अधिक माहिती दिली आहे.