Eknath Shinde Vs Sanjay Raut: शिंदे-राऊतांमध्ये पुन्हा जुंपली, दिल्ली भेटीवरून आरोप-प्रत्यारोप
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या भेटीनंतर संजय राऊत (Sanjay Raut), नवनाथ बान (Navnath Ban) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. 'जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात,' अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावर भाजपकडून नवनाथ बान यांनी पलटवार करत, संजय राऊत यांनीच राज्यसभेच्या खासदारकीसाठी उभाटा गट काँग्रेसमध्ये (Congress) विलीन करण्याची सुपारी राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) घेतल्याचा गंभीर आरोप केला. शिंदे यांनी मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे, तर बावनकुळे यांनी राऊत महायुतीमध्ये मीठ कालवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement