Eknath Shinde Skips Cabinet : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. दहा ऑगस्टला ते श्रीनगरला महारक्तदान शिबिराच्या निमित्ताने गेले होते. श्रीनगरला जाण्यापूर्वी सलग दोन आठवडे शिंदेंनी दिल्लीत जाऊन भाजपच्या श्रेष्ठींची भेट घेतली होती. त्यानंतरही त्यांची नाराजी दूर झाली आहे की नाही, याबद्दल आज चर्चा सुरू आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा घोळ कायम असणे, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या खात्यांना आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा, तसेच निधी देताना अजित पवारांकडून शिंदेंच्या मंत्र्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार, ही नाराजीची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. मंत्रीमंडळ बैठकीतील अनुपस्थितीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "आज पहिल्यांदा साडे दहाला कॅबिनेट घेण्यात आली. काही जणांना दिल्लीमध्ये होते, काही जणांना वेगळे काम, कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथे त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण एकोक्यानी महायुतीचं सरकार चालवतोय." या स्पष्टीकरणानंतरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola